Saturday, 30 May 2020

झाड जमिनीवर अंग टाकते.

फुले विसर्जित करून
फांद्यांची घडी घालून
पाने मुडपून
झाड अरण्यात
निघून जाते....
जमिनीखालच्या अंधारात
झरते, झुरते
झुरते, झरते .....
ही हवा, हा वसंत
आपल्या वाणासाठी नाही...
उमजून आणखी उलते
झाड जमिनीवर अंग टाकते...

No comments:

हुकलेले प्रश्न...

हुकलेले प्रश्न... फार क्वचित घडते, पण घडते. प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर सगळेच्या सगळेजण ‘चुकीचे’ देतात. प्रश्न तयार करणाऱ्यां...