समुद्रात सोडलेली मीठाची बाहुली मीच
उसळ्या मारते, किनाऱ्यावर फुटते, लाट मीच
विराणी होते, डोळ्यांमागे झरते, अश्रू मीच
चिमूट होते, ताटात बसते, तुझी चव होते.....
उसळ्या मारते, किनाऱ्यावर फुटते, लाट मीच
विराणी होते, डोळ्यांमागे झरते, अश्रू मीच
चिमूट होते, ताटात बसते, तुझी चव होते.....
मी समुद्राची खोली मोजत बसत नाही
ते माझे काम नाहीच
विरघळणे माझी वृत्ती....
ते माझे काम नाहीच
विरघळणे माझी वृत्ती....
उसळ्या मारत,
धावत धावत तुझ्या डोळ्यांत
धुसर काचेवर हात ठेवून
तुझ्या समुद्रात बुडून जाते
परत न सापडण्यासाठी
मी मीठाची बाहुली.....
धावत धावत तुझ्या डोळ्यांत
धुसर काचेवर हात ठेवून
तुझ्या समुद्रात बुडून जाते
परत न सापडण्यासाठी
मी मीठाची बाहुली.....
No comments:
Post a Comment