.... तर ओमान काय कधी कुणाच्या अध्यात मध्यात नसतो, आपण भले की आपली टापटीप, स्वच्छता बरी ! त्यामुळे सगळ्या GCC ने कोरोनाला घाबरून सुट्टी घेतली, तरी आम्ही डब्बल स्वच्छता पाळून श्रमत होतो.😌 पण शेवटी सुलतानसाहेबांनी फतवा काढला, आणि आजपासून मुलांसाठी शाळा बंद झाली. रोज फेस टू फेस भरणाऱ्या शाळा, रातोरात online गेल्या. 🙄
सगळ्या विषयांचे शिक्षक, त्यांचे हेडं, जुनी पुस्तकं नव्या रीतीने अभ्यासायला गोल करून बसले.🤓 कुठला लेसन online कसा घालता येईल, कशाच्या लिंका टाकायच्या, आपल्या कार्ट्यांना काय केलं तर मास्तर समोर नसतानाही धडा धड कळेल या विवंचनेत!🧐 तर काहीजण 'मी नाही बाई माझा चेहरा दिसू देणार, माझ्या व्हिडीओचा गैरवापर झाला तर!' म्हणत फलकारणाऱ्या, 🤷♀️ तर काही गडद मस्कारा आणि हलका पावडरीचा हात मारून लगेच स्क्रीनसाठी टकाटक तैय्यार 💃! काही I वरून IT च ओळखणारे प्रचंड उत्साही शिक्षक...👨💻👩💻.हा App recording साठी, तो shooting साठी, तो बोललेले डायरेक रेकॉर्ड करणारा.... त्यांना एकाच वेळी काय वापरू, किती वापरू याचं भरतं आलेलं ! सरामॕडमांचा माहोल नुसता.🦹♂️🦸♀️🦹♀️😀
बघता बघता एकएक लेसन तयार होऊ लागतो. सगळेच नवीन काहीतरी करू पहात होते, ते चित्र मनाला सुखावते.😌 या सगळ्यांची मोट बांधता बांधता आपण एकदम भानावर येतो, आणि एक चक्कर मारण्यासाठी आयटी रूमबाहेर जातो. मुले नसतात, त्यांचे हसू नसते, hi, hello, सलाम काहीच ऐकायला येत नाही, त्या सुरमेदार मुली नसतात, मैदानावर ते हाकारे नसतात, एका गोलसाठी जीव खाऊन बॉलमागे धावणारे नसतात, लायब्ररीत गढलेला एकही शुभ्र लिहाफ दिसत नाही, आर्टरूम अडगळीच्या खोलीसारखी दिसते .... कुणीच नसते! मुले नसलेली शाळा, थोडावेळ बरी वाटते, नंतर नकोसे वाटते.... 😶
पुढच्या काही वर्षांत virtual classroom ही कदाचित एक reality होईलही, पण आमच्यासारखे हाडामांसाचे मास्तर त्याचा भाग होऊ की नाही माहित नाही.😑
No comments:
Post a Comment