मस्कतमध्ये सिटी बसेस नव्हत्या. एक car culture, आणि दुसरे इथल्या taxi drivers चा संघटीत विरोध इत्यादी.
पण मागच्या वर्षी 'मैं चली मैं चली' म्हणत रेशमी झगा घालून वातानुकूलित अरबी लालपरी झोकात इथल्या रस्त्यांवरून धावू लागली. 💃💃
हमरस्त्यावरून कपाळावर लाईट मारत दुडूदुडू धावणारी अशी बस पहिल्यांदा दिसली आणि मी तोंड आ करून वेड्यासारखी बघतच राहिले! आनंद, आश्चर्य आणि नेहमीप्रमाणे 'आपल्या भारतातल्या सारखं' इथंही हे आहे, ही ख़ुशी.🥰😍
हमरस्त्यावरून कपाळावर लाईट मारत दुडूदुडू धावणारी अशी बस पहिल्यांदा दिसली आणि मी तोंड आ करून वेड्यासारखी बघतच राहिले! आनंद, आश्चर्य आणि नेहमीप्रमाणे 'आपल्या भारतातल्या सारखं' इथंही हे आहे, ही ख़ुशी.🥰😍
सोबत इजिप्शियन मैत्रीण होती, म्हणाली, 'अगं, बस पाहिली नाही का कधी?' तिला म्हणलं, 'या लालपरीच्या अंगाखांद्यावर आम्हा सामान्य भारतीयांचा जन्म जातो! पण मस्कतात पहिल्यांदा पाहतेय.' 😇
करोना काळात फेसबुक मैत्रीण
मेघना जोग-चापेकरने मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी धावणारी लालपरी बऱ्याच दिवसांनी पाहिली, आणि 'एकदम काहीतरी चमत्कार पाहिल्यासारखे तिच्याकडे बघत बसले,' असे लिहिलेले वाचले आणि अरबी लालपरीशी झालेली पहिली नजरभेट आठवली.
लालपरी लालपरी होती हैं , बंबई कि हो या मस्कत कि !! 🥰
(सिटीबसलापण आम्ही लालपरीच म्हणणार! 😎😎)

No comments:
Post a Comment